दैनिक स्थैर्य । दि. 29 सप्टेंबर 2024 । फलटण । अश्विन शुध्द प्रतिपदेला सुरु होणार्या नवरात्र उत्सवासाठी अनेक मंडळे सज्ज झाली असून फलटणच्या कुंभारवाड्यामध्ये दुर्गामतेंची मूर्ती पाहण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी येवू लागले आहेत.
श्री दूर्गामातेंच्या मूर्ती या 2 फूटापासून ते 6 फूटापर्यंत बनविण्यात आल्या आहेत याच्या सधारण किंमती 2 ते 7 हजार रुपये आहेत. वाघावरील दुर्गादेवी सप्तश्रृंगी देवी, वाघावर बसलेली अंबादेवी, महिषासूर मर्दीनी, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी यासह विविध प्रकारच्या देवीच्या मूर्ती मूर्तीकारांनी साकारल्या आहेत.
श्री दूर्गामातेंच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना त्यांच्या डोळ्यांची तेजस्विता आणि रंगरंगोटीमधील आकर्षकता वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.