शिकारीची पोस्ट महागात पडली चिकणवाडीच्या युवकाला; वनविभागाकडून संबंधित युवकाच्या चौकशीसह घराची झडती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । सातारा । सोशल मिडियावर शिकारीची पोस्ट करणे चिकणवाडीच्या ( करंदी- जावली ) युवकाला खूपच महागात पडले . नितीन आनंदा चिकणे या युवकाची मेढा वनक्षेत्रपाल रंजन परदेशी यांनी कसून चौकशी करून त्याच्या घराची झडती घेतली . मात्र कोणतीही शिकार आढळली नाही मात्र दोन फासक्या मात्र आढळून आल्या .

मित्रांवर इम्प्रेशन मारण्यासाठी आपण सोशल मिडियावर ही पोस्ट टाकल्याचे नितीन चिकणे या चौकशीत कबूल केले . याबाबत सविस्तर वृत्त असं की, चिकणवाडी करंडी, (ता. मेढा) या वस्तीतील नितीन आनंदा चिकणे यानं स्वत:च्या फेसबुक अकाऊंटला शिकारीच्या उद्देशानं पोस्ट टाकली. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाल्याने मेढा वनक्षेत्रपाल रंजन परदेशी यांनी तत्काळ हालचाल करून चिकणे याची कसून चौकशी सुरू केली .

मुंबईवरून गावाला आलो की, आपला आवडता छंद बंदूक घेऊन शिकार करणं, वाघरी लावणं असं बेधडक लिहून फेसबुकवर टाकलं. कायतरी सापडणारच, असा अतिआत्मविश्वासही व्यक्त केला. या सोशल मिडियाच्या पोस्ट सह शिकारीच्या ठिकाणाचा चिकणे याने टाकलेला फोटो त्यासाठी चांगलाच अडचणीचा ठरला . मेढा वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीनं चिकणवाडी गाठली. वनविभागाचा ताफा बघून नितीन ची चांगलीच तंतरली . वनविभागानं चौकशीला सुरुवात करताच नितीननं सदर पोस्ट दारूच्या नशेत मित्रांच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या उद्देशानं टाकली असल्याचं सांगितलं. शिकारीचा उद्देश नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंचा समक्ष नितीन चिकणे यांच्या घराची झडती घेतली असता कोणत्याही प्रकारचं शिजवलेलं अथवा कच्चं मांस आढळून आलं नाही. घरातील लाकडी कपाटात दोन वडिलोपार्जित जुनी वाघरी (जाळी) मिळून आल्या.


Back to top button
Don`t copy text!