स्थैर्य, दि.८: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जीबीपीयूएसडीमध्ये १.५४ टक्क्यांची घसरण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने तसेच युरोप आणि ब्रिटनदरम्यान ब्रेक्झिटसंबंधी तणावामुळे जीबीपीआयएनआरचे मूल्य ३.३ टक्क्यांनी वाढले. बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बेली यांनीही नकारात्मक व्याजदराच्या स्थितीचे संकेत दिले होते. त्यामुळेही पाऊंडचे अवमूल्यन झाले आहे. याबद्दल अधिक माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विश्लेषक श्री वकारजावेद खान.
कोव्हिड-१९च्या दुसऱ्या लाटेचा ब्रिटनला विळखा: ब्रिटनला कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा विळखा बसला असून २८ सप्टेंबर २०२० रोजी तेथे ४०४४ नवे रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ब्रिटन दररोज ४००० रुग्णांची नोंद करत आहे. दरम्यान, ब्रिटिश आरोग्य मंत्री मॅट हँनकॉक यांनी घोषणा केली की, ईशान्य इंग्लंडमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने कायदेशीर निर्बंध घालावे लागतील.
कोरोना विषाणूमुळे २०२० वर्षातील पहिल्या तिमाहितील सुरुवातीला लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुस-या तिमाहीत ब्रिटनची अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी आकुंचन पावली. दरम्यान, एप्रिल २०२० मध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी आकुंचन पावली तरीही जूनमध्ये ती ८.७ टक्क्यांनी विस्तारली. सेवा, बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रातील मोठ्या घसरणीमुळे जीडीपीतील घसरण दिसून आली. ब्रिटनचा आकुंचन पावलेला जीडीपी हा त्याच्या तुलनेतील विकसित सह अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात जास्त होता.
ब्रेक्झिटवरील अंतिम चर्चेसाठी ब्रिटन युरोपकडे: ब्रिटन आणि युरोपदरम्यान ब्रेक्झिटवरील चर्चेची अंतिम आणि ९ वी फेरी आता होईल. बाजाराच्या अहवालांनुसार, ऑक्टोबरच्या मध्यावधीतील महत्त्वाच्या युरोप परिषदेपूर्वी एखाद्या करारापर्यंत पोहोचतील, यासाठी दोन्हीही पक्ष आशावादी राहतील.
तथापि, करारातील दोन प्रमुख अडचणींवर निर्णय होईल. त्यापैकी एक म्हणजे, बाहेर पडल्यानंतर ब्रिटन युरोपमधील कोणणत्या राज्याच्या नियमांचे पालन करेल आणि दुसरे म्हणजे, ब्लॉकमधून मासेमारी करणा-या नौकांना ब्रिटिश पाण्यावर कशाप्रकारे हक्क मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजार विधेयकाने दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढला आहे. अंतर्गत बाजार विधेयकानुसार, ब्रिटनने तयार केलेल्या काही करारांचे ब्रेक्झिटनंतर उल्लंघन केले जाईल.
बीओई नोव्हेंबर २०२० मध्ये आपला बाँड बायबॅक प्रोग्राम विस्तारण्याची शक्यता: बीओई गव्हर्नरनी यापूर्वीच एका बैठकीत नकारात्मक व्याजदरांचे संकेत दिले होते. पण नंतर नकारात्मक व्याजदर स्थितीची शक्यता नाकारली. मध्यवर्ती बँकेसाठी नकारात्मक व्याजदराची अंमलबजावणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
नोव्हेंबरमध्ये धोरणकर्ते आपला बाँड बायबॅक प्रोग्राम वाढवतील, अशी अपेक्षा आहे. गव्हर्नर म्हणाले की, संकटापूर्वी अर्थव्यवस्थेची जी स्थिती होती, त्यापेक्षाही ती ७-१० टक्क्यांनी कमी आहे.
आउटलुक: वादग्रस्त अंतर्गत बाजार विधेयक हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मंजूर झाले व आता ते मंजुरीसाठी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये जाईल. ब्रेक्झिटचा संक्रमण कालावधी संपल्यानंतर ब्रिटनचा चार राज्यांशी मुक्त व्यापार संरक्षणाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र विधेयकात युरोप आणि ब्रिटनदरम्यानची मैत्री कायम आहे. तथापि, दोन्ही पक्षांमध्ये करार झाला तर आयरिश सीमा प्रश्नावरील उपायांची गरज भासणार नाही.
अँड्रयू बेली यांनी आधी नकारात्मक व्याजदराचे संकेत दिले पण नंतर आपले पत्ते खाली ठेवले. व्याजदर सकारात्मक स्थितीत असताना पाऊंड अपवादानेच खाली येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आणि देशाच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्यास आर्थिक सुधारणांकडे पुन्हा सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे जीबीआयएनआरस्पॉट (CMP: 94.5) ऑक्टोबर २०२० पर्यंत चढाईच्या दिशेने ९६ अंकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.