दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । मुंबई । जत तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ६ टीएमसी पाणी देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या ४० गावांना महाराष्ट्रात सामावून घेणे आणि पाणी मिळण्यासाठी कर्नाटक शासनाशी करार करण्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला.
जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, या 65 गावांना 6 टीएमसी पाणी म्हैसाळ येथून देण्याची योजना करण्यात आली असून, तांत्रिक बाबीही पूर्ण करण्यात आल्या आहेत. जलसंपादन विभागाच्या या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आहे. यानंतर लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येत.