
दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातील नाना पाटील पुतळ्यासमोरील खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील अत्यंत गजबजलेल्या वस्तीत असणार्या नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोरील असणारा खड्डा त्वरित बुजवावा. या खड्ड्यातून मोठे वाहन गेल्यास खड्ड्यातील दगड आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या अंगावर उडून त्यामुळे माणसे जखमी होत आहेत. संबंधित विभागाने हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी करण्यात येत आहे.