दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी आस्थापना मधील भरतीसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. २९ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता शिरवळ येथील श्रीपतराव कदम महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती फलटण पंचायच समितीच्या गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, डिप्लोमा, बीई (मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रो टेलिकॉम, ॲटोमोबाईल, कॉम्पुटर), आयटीआय (सर्व ट्रेड) या प्रकारची शैक्षणिक पात्रता धारण करणार्या व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिता विविध पदांसाठी विविध उद्योजकांकडे प्रत्येक्ष मुलाखतीची सुवर्णसंधी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने आपला सहभाग नोंदवावा. मुलाखतीस येताना आपले मुळ कागदपत्रे, पासपोर्ट साईझ फोटो व अर्जाच्या किमान पाच प्रती सोबत आणाव्यात असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी केले आहे.