यशाचा मार्ग हा ग्रंथातून शोधता येतो !. खासदार श्रीनिवास पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२४: कराड येथील समाजभूषण बाबूराव गोखले ग्रंथालय व परिसस्पर्श पब्लिकेशन यांच्या संयुक्त्त विद्यमानाने प्रा. दादाराम साळुंखे यांच्या चला वाचू आनंदे ! या लघु लेख संग्रहाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेण् यावेळी बोलताना ते म्हणाले “दर्जेदार ग्रंथांची निर्मिती ही आजच्या समाजासाठी आवश्यक आहे. वाचाल तर वाचाल या वाक्यात खूप मोठा अर्थ आहे. माणूस जोपर्यंत स्वतः वाचत नाही तोपर्यंत तो वाचण्याची शक्यता नाही चला, वाचू आनंदे! या पुस्तकातील चला या शब्दामध्ये चळवळ आहेए ही चळवळच वाचकांना व ग्रंथालयांना समृद्ध करण्यासाठी सक्षम आहे. मानवी जीवनात ग्रंथांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून संत एकनाथांनी संत ज्ञानदेवांचे अफाट तत्त्वज्ञान जगापुढे आणलेए ज्ञानेश्वरी ग्रंथाने माणसाला संस्कार दिलेए जगण्यासाठी बळ दिले. वाचकांनी ग्रंथ वाचताना सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन करावे कारण यशाचा मार्ग हा ग्रंथातून शोधता येतोय असे सांगून त्यांनी बहिणाबाई चौधरी, नरेंद्र जाधव यांची उदाहरणे दिली.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले वाचनातून लोकांच्या जीवनात आनंद, समाधान मिळावे तसेच लोकांची पाऊले ग्रंथालयांकडे वळावीत यासाठी या ग्रंथांतून वाचन संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न झालेला आहेण् सुज्ञ व चोखंदळ वाचक होण्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी तसेच लोकांमध्ये वाचनाची आवड व विश्वास निर्माण करण्याचे कसब प्रस्तुत ग्रंथांत आहे. 

या प्रसंगी पुस्तकाचे लेखक प्रा. दाराम साळुंखे यांचा शाल, श्रीफळ व बुके देवून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष श्री. सारंगबाबा पाटील, ग्रंथालयाचे प्रदेश सरचिटणीस श्री. संजय पिसाळ, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री. विनोद कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉँग्रेस चित्रपट, साहित्यए कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा सौ.क्रांती पाटील परिसस्पर्श पब्लिकेशनचे प्रकाशक श्री,प्रमोद मोहिते, श्री. सचिन हांडे युवा नेते श्री. सुनील जाधव, सौ.  कांचन धर्मे, श्री. विशाल भोसले, रुक्साना नदाफ इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. दादाराम साळुंखे यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!