माऊलींचे फलटण तालुक्यात जल्लोषात स्वागत; आज तरडगाव मुक्काम


दैनिक स्थैर्य | दि. 27 जून 2025 | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यामध्ये कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

लोणंद येथील दिड दिवसांचा मुक्काम संपवून आज माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात आगमन झाले. आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण असून आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा तरडगाव येथे असणार आहे. उद्या पालखीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे.

कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांच्यासह विविध शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


Back to top button
Don`t copy text!