‘सिड बॉल’च्‍या माध्‍यमातून वृक्षारोपणाने पालखी मार्ग हरित करणार – उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील वन विभाग व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सोलापूर  वन महोत्सवांतर्गत वारकऱ्यांच्‍या सोयीसाठी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा, रेल्‍वे, कॅनॉल, डोंगर मार्गावर ‘सिड बॉल’च्‍या (बीज गोळे) माध्‍यमातून वृक्षारोपन करुन ‘हरित वारी’ उपक्रम राबवित असल्‍याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍या निमित्‍ताने वन विभाग व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘सिड बॉल’ तयार करणेबाबत कार्यशाळा घेण्‍यात आली होती. यावेळी संगमेश्‍वर कॉलेजचे विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी यांनी पाच हजारापेक्षा जास्‍त ‘सिड बॉल’ तयार केले होते. त्‍याचे वाटप आज माळशिरस तालुक्‍यातील खुडूस वन विभागाच्‍या रोपवाटिकेसमोर करण्‍यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रसिध्‍दी अधिकारी अंकुश चव्‍हाण, सहाय्यक वनसंरक्षक बी.जी.हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद हाके, संजय भोईटे व प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.

बीज गोळे हे स्‍थानिक प्रजातीच्‍या बियापासून तयार करणेत आलेले आहेत. वारकरी हे बीज गोळे सोबत घेऊन जावू शकतात. बीज गोळे वारकऱ्यांनी वारीच्‍या प्रवासादरम्‍यान पालखी मार्गावर फेकावेत जेणेकरुन नवीन वृक्षसंपदा तयार होईल. सदरील ‘सिड बॉल’ मध्‍ये प्रामुख्‍याने वड, पिंपळ, कडूलिंब, अंजन, खैर, शिसू यांचे बिज वापरले आहेत. जेणेकरून सावली देणारे वृक्ष तयार होतील. या उपक्रमासाठी प्रकाश कुंभार यांनी पर्यावरणपूर्वक बियाणे उपलब्‍ध करुन दिले. बीज गोळे वाटप कार्यक्रमाची सुरूवात श्री क्षेत्र आळंदीपासून करून खुडूस रोपवाटिकेसमोर समारोप करण्‍यात आला.

कार्यक्रमासाठी आरएफओ दयानंद कोकरे, राजेंद्र आठवले, एपीआय नातेपुतेचे मनोज सोनवालकर,  हरिशचंद्र साळुंखे, पल्‍लवी संजय लडाकत, कल्‍पना पांढरे, शिला भोजगें, राजकुमार जाधव, करामत अली शेख, गणेश जगदाळे, धनंजय देवकर, दादासाहेब चंदनशिवे यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!