
दैनिक स्थैर्य | दि. 20 जुलै 2025 । कोळकी । गावाचा सर्वांगीण विकास हा विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कोळकीमध्ये सर्वांगीण विकास हा राजेंच्याच माध्यमातून झाला असल्याचे मत राजे गटाचे कट्टर समर्थक रुपेश (अध्यक्ष) नेरकर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना नेरकर म्हणाले कि, कोळकी गावावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष लक्ष आहे. त्यांचे मतदान सुद्धा कोळकीमध्ये असल्याने कोळकी गावच्या विकासामध्ये त्यांनी विशेष लक्ष दिलेले होते व आता सुद्धा आहे. आगामी काळामध्ये कोळकी गावाच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राजे गट कटिबद्ध आहे.
काही जण मुद्दामून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी त्यांच्या भूलथापांना बळी न पाडण्याचे आवाहन सुद्धा यावेळी नेरकर यांनी केले आहे.