‘कुली नंबर-1’सह इतर 9 चित्रपट सिनेमा हॉलऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार; वरुण धवन, राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या चित्रपटांची रिलीज डेट आली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य , दि.१०: अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात
केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासू सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी दिली आहे,
परंतू फिल्म प्रोड्यूसर्स अजूनही आपले चित्रपट सिनेमा हॉलमध्ये रिलीज
करण्यास तयार नाहीत. शुक्रवारी तीन मोठ्या हिंदी चित्रपटांसह एकूण 9
चित्रपटांनी ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. यात वरुण धवनचा ‘कुली नंबर 1’,
राजकुमार रावचा ‘छलांग’ आणि भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गावती’चा समावेश आहे.

हे
सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होतील. यात
तीन हिंदी, दोन कन्नड़, दोन तमिळ, एक मल्याळम आणि एका तेलुगू चित्रपटाचा
समावेश आहे.

क्रिसमसवर येथील ‘कुली नंबर 1’

या
चित्रपटांमध्ये सर्वात मोठा चित्रपट वरुण धवनचा ‘कुली नं. 1’ आहे. डेविड
धवनच्या डायरेक्शनमध्ये बनलेला हा चित्रपट 1995 मध्ये आलेल्या गोविंदा आणि
करिश्मा कपूर स्टारर चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाच वरुणसोबत सारा अली
खान आणि परेश रावल महत्वाच्या भूमीकेत आहेत. हा चित्रपट आधी 1 मे 2020 ला
रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

13 नोव्हेंबरला रिलीज होईल ‘छलांग’

राजकुमार
राव आणि नुसरत भरुचा स्टारर ‘छलांग’ 13 नोव्हेंबरपासून स्ट्रीम होईल.
चित्रपटात राजकुमार माँटी नावाच्या एका पीटी टीचरच्या रोलमध्ये आहे, तर
नुसरत त्याची प्रेयसी नीलूच्या भूमीकेत आहे. या चित्रपटाचे निर्माते अजय
देवगन, लव रंजन आणि अंकुर गर्ग आहे. तसेच, हंसल मेहताने हा चित्रपट
डायरेक्ट केला आहे. हंसल मेहतासोबत राजकुमारचा पाचवा चित्रपट आहे. यापूर्वी
दोघांनी शाहिद, सिटीलाइट्स, अलीगड आणि ओमेर्टामध्ये काम केले आहे. आधी हा
चित्रपट 13 मार्चला रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे रिलीज रद्द झाली.

रिलीज होणारे इतर सहा चित्रपट

1.
माने नंबर 13 (कन्नड) 2. भीमा सेना नलामहराजा (कन्नड) 3. सूराराय पोट्रू
(तमिळ) 4. मारा (तमिळ) 5. मिडिल क्लास मेलोडीज (तेलुगू) 6. हलाल लव स्टोरी
(मल्याळम)


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!