दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | सातारा |
महाराष्ट्रात खूप मोठी विकासकामे महायुतीने केली असूनही विरोधक चुकीच्या पद्धतीने अपप्रचार करून फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रामध्ये चांगले सकरात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभेचा प्रचार करताना याचा निश्चित फायदा महायुतीला होईल. सर्व भाजपच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी विरोधकांचे हे फेक नेरेटिव्ह खोडून काढणे गरजेचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले आहे.
शनिवार, ३ ऑगस्ट रोजी कनिष्क मंगल कार्यालय सातारा येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भंडारी बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करून लवकरच भारतीय जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचे भूमिपूजन सातारा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे संगितले.
प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले यांनी आभार मानले.
यावेळी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या आघाड्या, मोर्चे यांचे प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुख, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.