स्थैर्य, सातारा, दि. २६ : शिवाजी विदयापीठ शिक्षक संघ (सुटा) साताराच्या वतीने महाविदयालयीन प्राध्यापकांचे पदोन्नतीसाठी दि.२५. १२.२०२० रोजी सातारा जिल्हयामध्ये महिला महाविद्यालय कराड व सुटा सातारा कार्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. सकाळी १० ते १ महिला महाविद्यालय कराड व दुपारचे सदरात सुटा कार्यालय सातारा येथे कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेस प्रा. डॉ. कोरबु रस्सूल व प्रा. प्रकाश कुंभार यांनी ए.पी.आय., पी. बी.एस., येस.ऐ. आर बाबत प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी व नवनवीन होत असलेले बदल याबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन केले व प्राध्यापकांना उदभवणाऱ्या अडचणी व शंकाचे निरसन केले.
सदर कार्यशाळेस एकुण ६३ प्राध्यापक सुहभागी झाले होते. कराड येथील कार्यशाळेस सुटाचे माजी अध्यक्ष प्रा. एन. के. मुल्ला यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भुषविले तर सातारा येथील कार्यशाळेस सुटाचे विश्वस्त व मार्गदर्शक प्रा.ए.पी. देसाई सर यांनी भूषविले. ही कार्यशाळा व्यवस्थित पार पाडणेसाठी सुुटा अध्यक्ष सातारा डॉ. ईला जोगी यांचे मार्गदर्शन लाभले.
याकार्यशाळेस सुटाचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष प्रा.आर .के. चव्हाण, प्रा.थोरात, प्रा.मनोज गुजर, सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्रा. नरेंद्र गायकवाड, प्रा.डी.एस. काळे, कार्यवाह प्रा. सुहन मोहोळकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. तानाजी कांबळे यांनी आभार मानले.