सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे मंगळवारी विश्वस्त परिषद कार्यशाळेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। सातारा । शासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखडा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निश्चित केला.

त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी जिल्हास्तरीय, विभागीयस्तरीय कार्यालयांना विश्वस्त कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी विश्वस्त परिषद, कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता धनंजय गाडगीळ वाणिज्य कॉलेज येथे करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती सी. एम. ढबाले यांनी केले आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालय, व चॅरीटी बार असोसिएशन, यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्त परिषद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्वस्त परिषदेमध्ये मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मधील तरतुदी तसेच न्यासाच्या कामकाजा संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ सर्व विश्वस्तांनी घ्यावा असे आवाहनही सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!