दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । कराड । सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास जनमाणसासमोर मांडताना तो चुकीचा जाऊ नये. यासाठी महाराष्ट्र संपादक परिषद पुढाकार घेऊन विविध मीडियाच्या व्यासपीठावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तव इतिहास मांडला जावा. यासाठी आग्रही भूमिका घेईल अशी हमी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी दिली.
महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने पत्रकारांना मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. यावेळी महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, तळबीड येथील श्रीराम मंदिराचे ट्रस्टी व साईकिरण बाबा, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये, शिवसेनेचे विभागप्रमुख, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन चव्हाण, उपाध्यक्ष हेमंत सामंत, जगन्नाथ को ऑप सोसायटीचे चेअरमन राजेंद्र मोहिते, सचिव एकनाथ बिरवटकर, धोंडोपंत विष्णु पुरीकर, रमेश खोत, अमोल अंबेकर, आप्पासाहेब पाटील, गोरख तावरे, अरूण सुरडकर उपस्थित होते.
महाराष्ट्र संपादक परिषदेच्या माध्यमातून आत्तापर्यंत संपादक व पत्रकार यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. असेही प्रकाश कुलथे यांनी यावेळी सांगितले. वृत्तपत्राचे प्रश्न सोडवणुकीसाठी महाराष्ट्र संपादक परिषद नेहमीच संवेदनशील असल्याचे व पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी असे मनोगत महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे यांनी व्यक्त केले.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा दैदिप्यमान इतिहास अलीकडच्या काळामध्ये विविध माध्यमातून समाजासमोर मांडला जात आहे. याचा निश्चितपणे आनंद व अभिमान तळबीडकर वासियांना आहे. दरम्यान चित्रपट माध्यमातून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास मांडताना इतिहासाची तोडमोड केली जात आहे. याबाबत प्रास्ताविक व्यक्त करताना तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते यांनी खंत व्यक्त केली.
पत्रकार दीपक पवार, श्रीकांत चाळके, शंकर शिंदे, विजय अवसार, वैभव पाटील, प्रदीप रेवलेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश नलवडे, कराड उत्तर किसान सेलचे अध्यक्ष उमेश मोहिते, मुंबईचे नवउद्योजक योगेश धावडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव एकनाथ बिरवटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कराड तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अनिल मोहिते, जयप्रकाश मोहिते, तळबीड विकास सोसायटीचे चेअरमन नंदकुमार मोहिते, दादासाहेब मोहिते, संजय मोहिते, हरीश मोहिते, दत्तात्रय मोहिते, कांता पाटील यांच्यासह बहुसंख्य तळबीडमधीव मान्यवर उपस्थित होते.