नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव फेटाळला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


योगेश क्षीरसागर यांचे ठरावाच्या विरोधात मतदान

स्थैर्य, लोणंद, दि. 22 : लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात आज झालेल्या नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्या विरोधातील अविश्‍वास ठरावाच्या बैठकीला ऐनवेळी नाट्यमय वळण मिळाले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाचे तेरा सदस्य बैठकीसाठी एकत्रितपणे नगरपंचायतीत दाखल झाले मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांनी अनपेक्षितरित्या ठरावाच्या विरोधात मतदान केले.

वाई प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अविश्‍वास ठरावावर सह्या केलेल्या तेरा पैकी नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील, विकास केदारी, शैलजा खरात, हेमलता कर्नवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, किरण पवार, स्वाती भंडलकर, ऍड. पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके- पाटील, लीलाबाई जाधव, दीपाली क्षीरसागर अशा बारा नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी ठरावास सहमत दर्शवली नाही. आवश्यक मतदान न झाल्याने ठराव फेटाळण्यात आला.

नगरपंचायत सभागृहात खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, तसेच लोणंदचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले हे उपस्थित होते. ठरावास नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या सह माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके पाटील, कुसुम शिरतोडे व मेघा शेळके असे चार नगरसेवक अनुपस्थित राहीले होते. यावेळी सपोनि संतोष चौधरी यांनी आपल्या सहकार्‍यांसह चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!