तालुक्याचा विकास करणार्यांच्या सोबतच पुढील पिढीने राहणे गरजेचे : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये मोठा संघर्ष करून गेल्या तीस वर्षांमध्ये विविध अडचणी सोडवण्याचे काम आपल्या मार्फत करण्यात आलेले आहे. आगामी काळामध्ये नाईक-निंबाळकर घरातील पुढची पिढी आपली सेवा करण्यासाठी दाखल होत आहे. त्यासोबतच आपली ही पुढची पिढी फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी पुढे येत आहे. पुढील पिढीने फलटण तालुक्याच्या विकास करणाऱ्यांच्या सोबत राहणे गरजेचे आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करताना मान्यवर.

विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी येथे उद्योजक राजेंद्र माने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष सतीश माने यांच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदरील समारोप कार्यक्रमामध्ये ना. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथीलाराजे सत्यजितराजे नाईक निंबाळकर, युवा उद्योजक राजेंद्र माने, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सतीश माने, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकर माडकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना उद्योजक राजेंद्र माने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष सतीश माने त्यांच्यासमवेत मान्यवर.

येणाऱ्या काळामध्ये महिलांशी सुसंवाद साधून महिलांचे विविध प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. आता नागरिकांनी मुलगा व मुली मध्ये फरक न करता किंबहुना मुलापेक्षा मुलीला जास्त शिकवणे गरजेचे बनले आहे. पूर्वीच्या काळामध्ये महिला व मुली या बाहेर फिरू शकत नव्हत्या परंतु आता बहुतांश महिला व मुली ह्या स्कूटरवर फिरताना दिसत आहेत. अगदी ग्रामीण भागांमध्ये सुद्धा हेच चित्र आहे. आताच्या काळामध्ये नागरिकांनी मुलींमध्ये व मुलांमध्ये फरक करणे बंद करणे गरजेचे आहे, असे मत श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.

मी पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागणीसाठी गेलेलो होतो. त्यावेळी मी व माझ्यासोबत दोन सहकारी असे गेलेलो होतो. त्यावेळी फलटण तालुक्याच्या समोर विविध अडचणी होत्या. त्यातील बहुतांश या अडचणी या सोडवल्या गेलेल्या आहेत. मी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या पुढील वीस ते पंचवीस वर्षांचा विचार करून पावले टाकण्यात आलेली आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी विकास करणार्यांच्यासोबतच तरुण पिढीने जाणे गरजेचे आहे, असेही श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

श्रीमंत रामराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देत त्यांना दिर्घायुष्य लाभावे व फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्न हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोडवले जावेत. श्रीमंत रामराजे यांनी फक्त फलटण तालुक्याचे किंवा सातारा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राचे विविध प्रश्न विविध वेळी सोडवलेले आहेत. या सोबतच आपल्या राज्याचे पाणी हे दुसऱ्या राज्याला गेले असते परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुळेच आपल्या राज्याच्या हक्काचे पाणी हे आपल्या राज्याला राहिले आहे, असे यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले.

फलटण तालुक्यामध्ये विविध योजना आणून व फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करत फलटण तालुका नंदनवन करण्याचे काम विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. आगामी काळामध्ये फलटण शहराप्रमाणेच साखरवाडी हे शहर उदयास येईल व साखरवाडीचाही सर्वांगीण विकासासाठी श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जण कटिबद्ध आहोत, असे यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी शंकरराव माडकर, राजेंद्र माने, ज्ञानेश्वर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत रामराजे यांच्या वजनाएवढी पुस्तकांची तुला केली. सदरील पुस्तकांचे ग्रंथालय करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राजेंद्र माने यांनी दिली.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी परिसरातील जेष्ठ नागरिकांना चालण्याची काठीचे वाटप यावेळी सतीश माने यांच्या वतीने करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!