दुर्मिळ ‘मिस्वाक’ झाडाचे संवर्धनाची आवश्यकता

नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. 16 डिसेंबर : फलटण तालुक्यात दुर्मिळ मिस्वाक (पिलू / अराक) झाड अल्प प्रमाणात आढळून येत असल्याचे अलीकडे निरीक्षणात आले आहे. या झाडाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.  नुकतेच संस्थेचे पदाधिकारी गणेश धुमाळ, बोधीसागर निकाळजे तसेच सदस्य विजय पवार यांनी या झाडाचे निरीक्षण करून त्याची नोंद घेतली आहे. स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

फलटण तालुक्यात उष्णकटिबंधीय व अत्यंत खारट जमीन सहन करणारे डरर्श्रींरवेीर शिीीळलर या शास्त्रीय नावाने ओळखले जाणारे हे झाड साधारण 20 ते 25 फूट उंच वाढते. चंदनासारखी पाने, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणारी फुले आणि त्यानंतर लागणारी गुलाबी, पाणीदार व अतिशय गोड फळे ही याची प्रमुख वैशिष्ट्ये असून ही फळे माणसांसह अनेक पक्ष्यांसाठीही महत्त्वाचा अन्नस्रोत ठरतात.

या दुर्मिळ झाडाचे अस्तित्व नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण च्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या क्षेत्रीय निरीक्षणातून समोर आले आहे. मिस्वाक झाडाचे औषधी महत्त्व विशेष लक्षवेधी आहे. यामध्ये आढळणारे Salvadora persica  हे द्रव्य दातांमध्ये जीवाणूंची वाढ रोखून दातांचे संरक्षण करते. त्यामुळेच मिस्वाकच्या काड्या नैसर्गिक टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. तसेच सूज कमी करणे व वेदनाशामक गुणधर्मांमुळे आयुर्वेद व लोकवैद्यकातही या झाडाला विशेष स्थान आहे.

खारट व कोरड्या जमिनीत सहज तग धरणारे हे झाड आज फलटण परिसरात अत्यल्प प्रमाणात आढळून येत असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यावश्यक बनले आहे. नागरिक, शैक्षणिक संस्था व पर्यावरणप्रेमी संघटनांनी पुढाकार घेतल्यास या दुर्मिळ व उपयुक्त वृक्षाचे जतन होऊन फलटणची जैवविविधता अधिक समृद्ध होईल.


Back to top button
Don`t copy text!