
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभागाच्या वतीने दिनांक २७ जून २०२२ रोजी रुसा अंतर्गत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त ‘सामाजिक न्याय’ दिनाचे औचित्य साधून ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज: समकालीन संदर्भ’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी चे सचिव मा. प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून सदर विषयावरील कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.संदीप किर्दत यांनी करून दिली. प्रमुख साधन व्यक्ती मा. प्रसाद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्याचा व त्यांच्या विचारांचा सविस्तर आढावा घेतला. महात्मा फुले यांचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे चालविला आणि पुढे ही वाटचालीवरून समाजाचा विकास विविध माध्यमातून करण्याचे महान कार्य हे कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट जिवंत करण्याचे काम आपल्या व्याख्यानामधून मा. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वजण त्यांच्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्य प्रो.(डॉ.) अनिलकुमार वावरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याच्या रूपाने चालत आलेला बहुमोल वारसा आपण पुढे न्यावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. प्रा. महादेव चिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले तर प्रा. सौ.माधवी गोडसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्या डॉ. रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने-देशमुख यांनीही आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.
इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. बी. मासाळ, इतिहास विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. गणेश पाटील, महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, इतिहास विभागातील व महाविद्यालयातील सिनिअर व ज्युनिअर विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या बहुमोल सहकार्यातून सदरचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.