दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑक्टोबर २०२२ । आटपाडी । छत्रपतींच्या स्वराज्यात शेतकरी सुखी आणि समृद्ध होता. आज मात्र काबाड कष्ट करणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांनी घामाने पिकवलेला शेत माल केवळ विकून काहीजण मोठे उद्योजक झाले आहेत.
आता शेतकऱ्यांनी मोठे उद्योजक बनण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी कृषी पदवीधारकांच्या बुद्धीला स्वतःच्या बळाची जोड देऊन आधुनिक प्रयोग केल्यास ते नक्कीच समृद्ध होतील. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या उत्पादनाचा ब्रँड तयार करून थेट बाजारपेठ आणि ग्राहक शोधून मालाची विक्री केली तरच ते स्पर्धेच्या काळात उद्योजक म्हणून टिकतील असे मत मापटेमळा, आटपाडी येथील सुपुत्र व औसा लातूर येथील दिवाणी न्यायाधीश श्री. सुभाष लक्ष्मण फुले यांनी व्यक्त केले.
आटपाडी येथे आयोजित कृषि पदवीधर मेळावा व उद्योजकता मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी अतिशय अभ्यासू मार्गदर्शन केले.
माझा विधी शाखेचा अभ्यास असला तरी मी शेतकरी कुटुंबातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा मला माहीत आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषी तज्ञ एन. डी. पाटील व प्रशांत पाटील यांनी कृषी उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच सोलापूर शहर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे राहुल शेजाळ व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत नुकतेच आरटीओ इन्स्पेक्टर झालेले विशाल पाटील यांनी स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच केंद्रीय मंत्री लोढा यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर राक्षे यांनी कृषी पर्यटन या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी पदवीधर संघटनेचे एडवोकेट श्री धनंजय पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जीएसटी इन्स्पेक्टर श्री विनीत पाटील व श्री अनिल गळवे साहेब तसेच आटपाडी पंचायत समितीचे सहाय्यक बीडिओ श्री सचिन भोसले साहेब उपस्थित होते.
कृषी मित्र श्री विजय दादासाहेब मरगळे यांनी त्यांच्या शेतीतील डाळिंब फळाचे उच्चांकी उत्पादन करून डाळिंबे साता समुद्रापलीकडे निर्यात केली व चांगले उत्पादन मिळवले म्हणून श्री विजय मरगळे यांचा सत्कार न्यायाधीश श्री सुभाष फुले यांच्या हस्ते करण्यात आला.
कृषी मित्र श्री. बी.जे. देशमुख सर यांनी पीएचडी डॉक्टरेट पदवी मिळावल्याबद्दल न्यायाधीश श्री सुभाष फुले यांच्या शुभहस्ते श्री बी जे देशमुख सरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती कल्याण परिवर संस्थेचे श्री प्रसादराव देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री श्रेयश गुलाबराव पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास आटपाडी येथील प्रगतशील बागायतदार श्री गुलाबराव पाटील, श्री सूर्यकांत देशमुख, सद्गुरू काॅलेज ऑफ ॲग्रीकल्चर मिरजगाव जिल्हा अहमदनगर चे कर्तृत्ववान प्राचार्य डॉ. श्री राम बीटे, मिरज येथील कृषी मंडळ अधिकारी श्री सचिन ढेरे, सातारा पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी श्री शंतनू राक्षे, कृषी अधिकारी श्री कमलेश घोडके, श्री रवींद्र घुटुकडे, श्री गोरख जरे, श्री टी. के. माने, श्री. सूर्यवंशी, श्री भाऊसाहेब कदम, श्री सखाराम पाटील, श्री प्रवीण पाटील, पशुवैद्यकीय डॉक्टर श्री सोमेश्वर गाढवे, डॉक्टर जीवन पाटील, इंजिनिअर श्री पवनकुमार विजयसिंह पाटील, डॉक्टर श्री. प्रसाद पाटील, श्री बजरंग फडतरे, श्री प्रकाश विभुते सर, श्री विठ्ठल माळी सर, श्री जावीर सर व इतर अनेक मान्यवर तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.