वूक्षलागवडीबरोबरच वूक्षसंवर्धन काळाची गरज; उपसरपंच दिपकराव नलवडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औंध, दि. १९: वूक्षलागवडीबरोबरच वूक्षांचे जतन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन औंधचे उपसरपंच दिपकराव नलवडे यांनी केले.

औंध येथे वूक्ष लागवड प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रगतीशील शेतकरी व युवा नेते गणेशराव देशमुख, शैलेश मिठारी,विजयसिंह दळवी,संदिप जाधव,प्रतापसिंह दळवी,इंद्रजित दळवी,नामदेव आवटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेशराव देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वैविध्यपूर्ण पिक पध्दतीचा अवलंब करण्याबरोबरचजास्तीत जास्त उत्पन्न मिळणारी झाडे लावावीत.
यामध्ये आंबा, चिंच,साग,चंदन,चिकू,आवळा,जांभूळ व अन्य प्रकारची झाडे लावल्यास पुढील पाच ते सात वर्षात शेतातील पिक उत्पादनाबरोबरच झाडांपासून ही मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे.
औंधसह परिसरातील हवामान हे वूक्षलागवडीसाठी पोषक आहे त्यासाठी एकाच प्रकारची झाडे लावून त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणार आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे असे आवाहन ही  गणेश क्षदेशमुख यांनी  केले. सूत्रसंचालन इंद्रजीत दळवी यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!