FIR मध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाही, तर इंडिया टुडेचे नाव; मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण – अटकेतील आरोपीने रिपब्लिकचे नाव घेतले होते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि ९: TRP म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉइंटमध्ये बनावटपणा करण्याच्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. मुंबईतील टीआरपीची जबाबदारी सांभाळणारी कंपनी हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे ​​डेप्युटी जनरल मॅनेजर नितीन देवकर यांनीही एफआयआर दाखल केला आहे. याची जी कॉपी समोर आली आहे त्यामध्ये ‘रिपब्लिक’ नाही तर ‘इंडिया टुडे’चे नाव मेंशन केले आहे.

पोलिसांचा दावा – साक्षिदाराने रिपब्लिक टीव्हीचे नाव घेतले

एफआयआरची प्रत पुढे आल्यानंतर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे म्हणाले की, हंसांच्या एफआयआरमध्ये इंडिया टुडेचे नाव देण्यात आले होते, परंतु अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने चौकशी दरम्यान रिपब्लिक टीव्ही व 2 मराठी वाहिन्यांचे नाव घेतले होते. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे या तिन्ही वाहिन्यांविरूद्ध पुरावे सापडले आहेत. आमची चौकशी अद्याप सुरू आहे. कोणत्याही वाहिन्यांविरूद्ध पुरावे आढळले तर तपास त्यानुसार पुढे जाईल.

गुरुवारी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला होता की बनावट टीआरपी मिळविण्याच्या खेळामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि 2 मराठी वाहिन्यांचा सहभाग आहे. पैसे देऊन ते टीआरपी वाढवत होते. या प्रकरणात 2 मराठी वाहिन्यांच्या मालकासह 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली.

पोलिस आज समन्स पाठवू शकतात

या प्रकरणात पोलिस आज रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्नब गोस्वामी, प्रमोटर्स आणि काही दुसऱ्या लोकांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवू शकतात. कमिश्नरने गुरुवारी याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, तपासाचा व्याप वाढल्यावर काही लोकांना समन्स पाठवले जाऊ शकते.

टीआरपी गेम कसा सुरू होता?

आयुक्तांनी सांगितले की तपासणी दरम्यान अशी घरे सापडली आहेत जेथे टीआरपी मीटर बसवण्यात आले होते. या घरातील लोकांना पैसे देऊन दिवसभर एकच चॅनेल चालवले जात होते, जेणेकरून चॅनेलची टीआरपी वाढेल. ते म्हणाले की, काही घरे असे आहेत जे बंद असूनही तिथे टीव्ही सुरू राहायचा. एका प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्तांनी असेही सांगितले की चॅनल किंवा एजन्सीकडून या घरातील लोकांना दिवसाला 500 रुपयांपर्यंत पैसे दिले जात होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!