पाडेगावच्या राहुल मोहितेचे खूनी पोलीसाच्या जाळ्यात; अल्पवयीन सह पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । लोणंद । पाडेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी राहूल मोहीते याचा गळा चिरून अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. कसलाच पुरावा मागे न सोडता केलेल्या या खूनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. लोणंद पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवत अखेर या खूनाचा उलगडा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी १० मे २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास घराबाहेर खाटेवर झोपलेल्या राहुल मोहीते या तरूणाचा निर्घृणपणे गळा चिरून खून केल्याची घटना पाडेगाव येथील शिवेचामळा येथे घडली होती. या गुन्ह्य़ात आरोपींनी कसलाच पुरावा मागे सोडलेला नव्हता, स्थानिक गुन्हे शाखेनेहीअनेक संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करूनही काहीच हाती लागत नव्हते. सदर खुनाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाबाबत वेळोवेळी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला भेट देवुन योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते. गुन्हयाचा तपास चालू असताना सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, व त्याचे सहकाऱ्यांनी गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपींची कठोर परिश्रमानंतर या अवघड गुन्ह्य़ाचा यशस्वी तपास करत या गुन्ह्य़ातील एका अल्पवयीन सह पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले.

गेले तीन महिन्यापासुन गुन्हयातील आरोपी हे पोलीसांना गुंगारा देत होते. आरोपीचे दहशतीमुळे गावातील तसेच परिसरातील कोणीही माहिती देण्यास तयार होत नव्हते. आरोपीची संपुर्ण माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे पोहवा अविनाश नलवडे, पोका विठ्ठल काळे, पोना श्रीनाथ कदम यांनी खब-या मार्फत माहिती प्राप्त करुन सहा. पोलीस निरीक्षक वायकर यांना दिली. त्यानंतर विशाल वायकर व सहका-यांनी सदर माहितीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपासाची वेगाने सुत्रे हालवुन प्रकाश ऊर्फ अजित किसन गोवेकर रा. कोरेगाव ता.फलटण, दत्ता मारूती सरक रा. पाडेगाव ता.फलटण, योगेश श्रीरंग मदने रा. कोरेगाव ता फलटण, गणेश बापू कडाळे रा. पाडेगाव ता.फलटण व एक अल्पवयीन अशा आरोपींना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी आरोपीना कौशल्यरित्या विचारपुस करुन गुन्हयाचा तपशीलवार घटनाक्रम उघडकिस आणला असुन आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीची पोलीस कोठडी घेवुन गुन्हा कोणत्या कारणासाठी, कोणत्या हत्याराने केला याबाबत तपास करण्यात येणार आहे.

अजयकुमार बन्सल,. पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक, तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विशाल के. वायकर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जी. माने पोलीस उपनिरीक्षक ,स्वाती पवार पोलीस उपनिरीक्षक, कय्युम मुल्ला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, अतुल कुंभार, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, अवधुत धुमाळ, अभिजीत धनवट, फैयाज शेख, केतन लाळगे, अविनाश शिंदे, बापुराव मदने, गोविंद आंधळे, चालक विजय शिंदे, अमोल अडसुळ, महिला अंमलदार शुंभागी धायगुडे, प्रिया नरुटे, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विशाल के वायकर व त्यांचे सहका-याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!