स्थैर्य, कोळकी : सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. करोना नंतर नागरिकांची रहदारी ही आता शहरात वाढलेली दिसून येत आहे. त्यात पावसामुळे सर्व ठिकाणी चीक चीक झालेली आहे. बरेच जण गाडीवरून तर किंवा पाय घसरून पडण्याचे प्रकार वाढत आहेत. फलटण शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या मुताऱ्या ह्या स्वच्छ करण्याची नितांत गरज असून त्या मध्ये घाणेरडा वास व काही ठिकाणी तर आळया झालेल्या दिसून येत आहेत. त्या या प्रकारामुळे आतमध्ये जाऊन आल्यानंतर नागरिक हे अक्षरशा नगरपालिकेला शिव्या देत बाहेर येत आहेत. तरी फलटण नगरपालिकेने शहरात असणाऱ्या मुताऱ्या कायम स्वच्छ ठेवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.