स्थैर्य, मुंबई, दि. २८ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशन हे जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला मुहूर्त मिळत नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिले अधिवेशन जे पूर्ण काळ चालले ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन. हे अधिवेशन सुरू असतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळावे लागले. महाराष्ट्र विधानसभेचे जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरु होणार होतं. मात्र आता अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
अधिवेशनाच्या काळात विधानभवनात लोक गर्दी करतात. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो. तसेच प्रशासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी विधानभवनात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या लोकांनी एकत्र येणं धोकादायक ठरेल. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याच निर्णय घेण्यात आला आहे.