दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । फलटण । निरगुडी ता. फलटण येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या कौतुक सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन केंगार बोलत होते.
निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळामार्फत सन 2006 सालापासून गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानिमित्त विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबविले जातात. याही वर्षी विविध स्पर्धा आणि वह्या व पेन वाटपाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रा. विजय केंगार, सामाजिक कार्यकर्ते सेवकभाऊ अहिवळे, हनुमंतदादा केंगार, फलटण तालुकाध्यक्ष बापूराव करे, होलार समाज युवक नेतृत्व संदीप गोरे, पत्रकार प्रशांत सोनवणे, पत्रकार शशिकांत गेजगे उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ तानाजी गोरे, महादेव गोरे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र गोरे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष लहुकुमार गोरे यांनी मंडळाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. पत्रकार निलकुमार गोरे यांनी आभार मानले.
यावेळी रामराजे युवा मंच निरगुडीचे संघटक सुनील गोरे, पत्रकार सुरज गोरे, अनिल गोरे, ज्योतिर्लिंग सोसायटीचे संचालक रघुनाथ गोरे, अक्षय आवटे, संदीप गोरे, जगन्नाथ गोरे,सागर गोरे, अजित गोरे, अभिजीत गोरे, देवराज गोरे, दयानंद आवटे, विशाल गोरे, अमित आवटे, गणेश गोरे,बारिकराव गोरे,बट्याबापू गोरे, शंभूराज गोरे, राजेंद्र गोरे, प्रविण गोरे ,उमेश गोरे, अमोल गोरे, आदेश गोरे, गिरीश गोरे, संकेत गोरे उपस्थित होते.