दैनिक स्थैर्य | दि. 31 डिसेंबर 2022 | फलटण | फलटण तालुक्यातील मिरेवाडी (कु) ग्रामपंचायत निवडणूक ही नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सरपंच व सर्व सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतच्या सरपंच पदी राजाराम सोनवणे तर सदस्य पदी मीनाक्षी धायगुडे, पुष्पा शेळके, मच्छिंद्र सरक, मालन कोळपे, बाळू गोरे, सविता नरुटे, नंदलाल नरुटे यांची वर्णी लागलेली आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी संतोष ठोंबरे, विठ्ठलराव खरात, दीपक नरुटे, संजय शिंदे, मेजर ठोंबरे, परशुराम नरुटे, बिरदेव नरुटे, माणिक शेळके, बबन नरुटे, विनोद रुपनवर, बाळासाहेब धायगुडे, अमोल शेळके, नानासाहेब ठोंबरे, सोमनाथ धायगुडे, पंढरीनाथ नरुटे, संजय धुमाळ, भिकाजी नरुटे, सुनील कोळपे, अजित कोरडे, संदीप पिसाळ, विलास गोरे, संपत पिसाळ, माऊली थोरात, तुषार करे व अरुण जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये मिरेवाडी (कु) गावाचा पूर्ण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू, असे आश्वासन नवनियुक्त सरपंच राजाराम सोनवणे यांनी यावेळी दिले.