दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेला तेरा वर्षाचा विधिसंघर्षग्रस्त शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निरीक्षणगृहातून पळून गेला . या घटनेमुळे निरीक्षणगृहात खळबळ उडाली आहे संबंधित मुलाचा निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सदर बाजार येथील निरीक्षण गृहाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे सर्व मुलांना तेथील एका इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे दरम्यान शुक्रवारी रात्री आठ वाजता सर्व मुले जेवण करण्यासाठी जात होती त्यावेळी तेरा वर्षाचा विधिसंघर्ष बालक तेथून पसार झाला.
काही वेळा नंतर हा प्रकार बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला त्यांनी सातारा बस स्थानक रेल्वे स्टेशन येथे जाऊन त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यामुळे बालगृहातील कर्मचारी विजय सपकाळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या बालकाचा शोध सुरू ठेवला आहे.