श्रीमंत सिद्धसेनराजे व सौ. कृष्णादेवी यांचा विवाह शाही थाटात संपन्न

विविध मान्यवरांची उपस्थिती; ढोल ताशांच्या गजरात वधू वरांची मिरवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 4 मार्च 2025 । आसू । सरलष्कर बहाद्दर जहागीरदार स्व. श्रीमंत यशवंतसिंह आप्पासाहेब निंबाळकर ऊर्फ श्रीमंत दादाराजे खर्डेकर व स्व. श्रीमंत सौ. सुदेष्णाराजे यशवंतसिंह निंबाळकर खर्डेकर यांचे नातू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष सरलष्कर बहाद्दर जहागीरदार श्रीमंत शिवरुपराजे यशवंतसिंह निंबाळकर ऊर्फ बाळराजे खर्डेकर व श्रीमंत सौ. दिव्यांजलीराजे निंबाळकर खर्डेकर यांचे द्वितीय सुपुत्र श्रीमंत सिद्धसेनराजे निंबाळकर खर्डेकर यांचा शुभविवाह श्रीमान डी. एन. वैद्य व सौ. क्षमा वैद्य यांची नात आणि श्रीमान सौ सीमा देवी व श्रीमान दिग्विजय दत्तात्रय वैद्य यांची कन्या कृष्णादेवी यांच्या समवेत नुकताच पुणे येथे शाही थाटात विवाह संपन्न झाला.

वधू – वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहु महाराज, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, श्रीमंत छत्रपती संयोगिताराजे, श्रीमंत छत्रपती मधुरीमाराजे, श्रीमंत छत्रपती शहाजीराजे, राजकुमारी श्रीमंत छत्रपती यशस्वीराजे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत छत्रपती रुद्रनीलराजे भोसले व श्रीमंत छत्रपती रुणलीराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसन व मदतकार्य मंत्री मकरंद पाटील, क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे, खासदार प्रणिती शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन खा. नितीन काका पाटील, व्हा. चेअरमन अनिल देसाई, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, बहिर्जीराजे घोरपडे, कार्तिकराजे घोरपडे, करणसिंह पवार (धार), सरदार सिद्धोजीराजे शितोळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, लेफ्टनंट जनरल भारद्वाज, लेफ्टनंट जनरल निंबोळकर साहेब, ग्वाल्हेरचे सरदार विक्रमसिंग माहूरकर, समरजितसिंह राजेघाडगे, शर्मिलादेवी पवार, मदनदादा भोसले, प्रभाकर घार्गे, आ. मनोज घोरपडे, आ. रणजीत मोहिते पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, गोवा कॅबिनेट मंत्री विश्वजीत प्रतापसिंह राणे, आमदार देविया विश्वजीत राणे, युवराज बहिर्जी घोरपडे, सत्यजीत पाटणकर, बाळासाहेब सोळसकर, तुषार मोहिते, सहकार आयुक्त दिपक तावरे, नितीन काळे देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळ संचालक माणिकराव सोनवलकर, तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, एम. के. भोसले, संजयकुमार भोसले, जॉइंट कमिशनर संजयसिंह आमनापूरे, ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर, महानंदचे माजी व्हाईस चेअरमन डी. के. पवार, अशोकशेठ सस्ते, माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवदांपत्याला शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. दरम्यान सायंकाळी सनई चौघडा, ढोल ताशांच्या गजरात सजवलेल्या रथातुन वधू वरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. श्रीमंत धीरेंद्रराजे निंबाळकर खर्डेकर व श्रीमंत डॉ. सौ. संयुक्ताराजे निंबाळकर खर्डेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

 


Back to top button
Don`t copy text!