स्थैर्य, मुंबई, 23 : अमेरिका तसेच चीनमधील काही भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम राहिल्याने सोन्याच्या किंमतीत ०.७ टक्क्यांची वाढ होऊन ते १७५४.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. साथीच्या आजाराभोवतीच्या अनिश्चिततेने सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे बाजाराच कल असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने निराशात्मक वास्तवाकडे संकेत दर्शवले. ते म्हणजे पुरेशा प्रमाणात उपाययोजना न केल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढतच आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी वास्तविक आणि व्यवहारिक प्रोत्साहनपर आणि आधार देणाऱ्या उपाययोजना केल्याने पिवळ्या धातूच्या किंमतींना आधार मिळाला.
चांदीचे दर सोमवारी १.२५ टक्क्यांनी वाढून १.८ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवरील दर ०.२८ टक्क्यांनी वाढू ४८,५०० रुपये प्रति किलोवर बंद झाले.
कच्च्या तेलाचे दर १.७९ टक्क्यांनी वाढून ४०.५ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. ओपेकने तीव्र उत्पादन कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हे परिणाम दिसून आले. तथापि, चीनसारख्या अनेक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने कच्च्या तेलातील नफ्याला मर्यादा आल्या. जगात तेलाला आधीच कमी मागणी आहे, तसेच हवाई आणि रस्ते वाहतुकीवरील निर्बंधांमुळेही तेलाच्या किंमतीतील वाढ रोखली गेली आहे.