
दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालय, फलटणतर्फे ‘यंदा कर्तव्य आहे ना…?’ हा मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह जुळवून आणण्यासाठी भव्य मराठा वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. मराठा समाजातील सर्व इच्छुक वधु-वर पालकांनी आजच आपल्या पाल्यांचे नाव रु. १५१ /- शुल्क भरून नोंदणी करून टोकन घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी…
- श्री. सुनील गरूड, फलटण, मो. ९८२३४१६७४२
- श्री. सुनिल सस्ते (सस्तेवाडी), मो. ९२२६९२३००१
- श्री. युवराज पवार, फलटण मो. ९१७५३४१८०४
- श्री. सूर्यकांत पवार, फलटण मो. ७४९८१४१०४३
- श्री. मधुकर भोईटे (आरडगांव) मो. ८२७५७९१२८३
- श्री. सुधीर यादव, फलटण मो. ९९७५८३२९०३
- श्री. अमोल सस्ते, निरगुडी मो. ९९७५१९२६२६
- श्री. शंभूराजे खलाटे, खुंटे मो. ९६७३३७१४१४
- श्री. अमोल भोईटे, फलटण मो.७०२०६६८६१६
- श्री. राजाभाऊ निंबाळकर, मलठण मो. ८५५१९७११७७
- श्री.नंदकुमार गायकवाड, फलटण मो. ९०११०६२०८४
- श्री. राजेंद्र बोंद्रे, वाठार निंबाळकर मो. ९२८४८९०९०१
यांच्याशी फोनवरून संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालय, स्वरा हाईटस्, बेसमेंट, गाळा नंबर २ ए, रिंगरोड, डी. एड्. चौक, फलटण, ता. फलटण, जि. सातारा, संपर्क : ७४१०७२५७४३ येथे संपर्क साधावा.
परिचय मेळावा स्थळ : सजाई गार्डन मंगल कार्यालय, विंचुर्णी रोड, फलटण, वेळ- दिनांक ०१/०९/२०२४, रविवारी सकाळी १० वाजलेपासून.
कार्यक्रमादिवशी कार्यक्रमस्थळी स्नेहभोजनाची व्यवस्था केल्याची माहिती आयोजक मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.