द. म. क. जावली सहकारी बँकेविरोधात अपहाराचे तीन गुन्हे दाखलएकाच कुटुंबातील तिघांनी दिली तक्रार  

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.९: दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेविरोधात अपहाराचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तिन्ही तक्रारी एकाच कुटुंबातील नलवडे यांनी दिल्या असून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला आहेे.

पहिली तक्रार राहूल सुधाकर नलावडे (रा.वाढे ता. सातारा) यांनी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेचे कर्ज विभाग प्रमुख रविंद्र संपत देशमुख, व्यवस्थापक पवार, चेअरमन चंद्रकांत गावडे, संचालक मंडळ, कर्ज व्यवस्थापक यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. संशयितांनी तक्रारदार यांचे आरटीजीएस करण्यासाठी घेतलेल्या सही केलेल्या कोर्‍या धनादेशाचा गैरवापर केला. खात्यावरील परस्पर 16 लाख रुपये वर्ग केले. तसेच दुसर्‍या कोर्‍या धनादेशाचा गैरवापर करुन 6 लाख रक्कम कुलकर्णी नावाच्या व्यक्तीच्या नावे काढून अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहेे.

दुसरी तक्रार ज्योती विशाल नलावडे (वय 36, रा.सदरबझार) यांनी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेचे तत्कालीन व्हाईस चेअरमन शैलेंद्र दत्तात्रय जाधव व काही संचालक यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. संशयितांनी तक्रारदार यांचे पती व दीर यांच्या खात्यातील 33 लाख रुपये खात्याकडून वसूल न करता ती तक्रारदार यांच्या 8 लाख 40 हजार रुपये घेतली. संबंधित रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्याविरुध्द फसवणूकीची तक्रार दिली आहे.

तिसरी तक्रार विशाल नलावडे यांनी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेचे रविंद्र देशमुख, चेअरमन गावडे, संचालक मंडळ यांच्याविरुध्द दिली आहे. तक्रारदार यांनी यातील संशयित रविंद्र देशमुख याच्याकडे विश्‍वासाने खात्यावर भरण्यासाठी 11 लाख रुपये दिले. मात्र त्याने पैसे खात्यावर भरले नाहीत. संबंधित रक्कम इतर संशयितांनी माघारी देतो, असे आश्‍वासन दिले. मात्र त्यांनी ती रक्कम परत मिळवून दिली नाही, यामुळे संशयितांविरुध्द तक्रार दिली आहे.

दरम्यान, या तिन्ही घटना सन 2016 ते 2018 या कालावधीत घडल्या आहेत. शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!