मुधोजी हायस्कूलमध्ये 1975 च्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात


दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। फलटण । येथील मुधोजी हायस्कूलमध्ये 1975 च्या बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी या मेळाव्याचे समन्वयक नंदकुमार केसकर यांनी 1975 पासून शाळेतून बाहेर पडल्यावर नोकरी व्यवसाय यामध्ये रममाण झालो. पुन्हा एकदा या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांची परत भेट व्हावी या उद्देशाने हा समारंभ आयोजित केल्याचे सांगितले.

व्ही.वाय. माने म्हणाले, आपली पिढी जुनी आहे, आपणावर त्यावेळी जे संस्कार झाले त्यातूनच आपण उत्तम नागरिक घडलो आता परिस्थिती बदलली आहे. तरीही आपण नवी व जुनी पिढी यामध्ये समन्वय साधावा. नवीन पिढीला समजावून घ्यावे, आपला छंद जपावा जोपासावा, आपली तब्येत उत्तम ठेवावी व कौटुंबिक स्वास्थ्य राखावे असे सांगितले.

विजय ताथवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. मीना सहस्त्रबुद्धे यांनी गणेश स्तवन सादर केले. आशा वेलणकर- प्रभुणे यांनी ‘पाहुनी रघुनंदन सावळा’, ‘तोच चंद्रमा नभात’ ही गीते सादर केली. यावेळी मोहन मोरे व अजित देशमाने यांनी शाळेतील जुन्या आठवणी व शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या. दिलीप कुलकर्णी यांनी जुन्या व नव्या नाण्यांचा संग्रह कल्पक मांडणी करून साजरा केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय ताथवडकर यांनी केले.  चंद्रशेखर हेंद्रे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!