दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील श्री. गोपालकृष्ण मंदिर, गिरवी येथे नुकताच भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
हे मंदिर प्राचीन व जागृत म्हणून ओळखले जाते. वृंदावन, वाराणसी, रामेश्वर अशा तीर्थस्थानी निरुपण करणारे भागवताचार्य श्री. अनंतशास्त्री मुळे, आळंदी यांच्या अमोघ वाणीतून भागवताचे कथामृत सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कथामृताच्या अंतर्भूत सुदाम्याचे पोहे, गोवर्धन लीला, कृष्णाच्या बाल लीला, रुक्मिणी स्वयंवर यासारख्या कथांनी अमोघ वाणीतून श्रोते मंत्रमुग्ध झाले. या सप्ताह काळात पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापुर्र, फलटण येथील साधकांनी या भागवत सप्ताहाची अनुभुती घेतली. याबाबत आपले अनुभव साधकांनी विषद केले. तसेच निरुपणकार मुळे शास्त्री यांनी या स्थानाचे महात्म्य व स्वत:चे अनुभव कथन केले. यावेळी सर्व भाविकांना व ग्रामस्थांना महाप्रसादाचा लाभ मिळाला.