
दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। कोळकी । महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शिक्षकांनी वेळोवेळी क्षमतेनुसार मार्गदर्शन केले. आता आपण पदवी घेऊन बाहेर पडणार आहात. त्यामुळे खर्या अर्थाने आपल्या प्रगतीला आता सुरुवात होत आहे. त्यावेळी योग्य ठिकाणी जाण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी केले. बीए भाग तीनच्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते.
यावेळी डॉ. टी.पी शिंदे, डॉ. पी. आर. पवार डॉ. एन. सी. धवडे, डॉ. एस. ए. माने डॉ. एन. के. रासकर, डॉ. एस. टी. कदम, डॉ. ए. एस. जाधव, प्रा.जी. आर. पवार, डॉ.ए एन शिंदे आदी मान्यवर होते.
सुरुवातीस श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य कदम म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञानदान करण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले. त्यामधून विद्यार्थी व शिक्षकांचे नाते घट्ट झाले. अशा शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळते. आज शिक्षण घेतल्यानंतर काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला असला तरी शिक्षकांनी आशावादी प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी आता पदवीनंतर पुढे काही ना काही व्यवसायिक कोर्सेस करणे आवश्यक आहे. निकालानंतर पालकांना पुढील शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. तरच सध्या शिक्षणाचा उपयोग होईल.
कार्यक्रमात गुणवान विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी स्नेहलता बिचुकले, ऐश्वर्या कदम , साक्षी घनवट या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास झाल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. एस. सी. जगताप डॉ, राहुल चौरे, डॉ. पी. आर. पवार, डॉ. एस. टी. कदम, डॉ. ए. के. शिंदे, प्रा. प्रकाश शिंदे या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. डॉ.जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माने यांनी आभार मानले. पत्रकार मुगूटराव कदम यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.