शिवणी पिसा येथील पाईपलाईनमधील गळती १५ दिवसांत दुरुस्त करावी – मंत्री दादाजी भुसे


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२३ । मुंबई । समृद्धी महामार्गावर असलेल्या शिवणी पिसा येथील नादुरुस्त पाईपलाईनमधील गळती १५ दिवसांत बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांनी दिले.

श्री.भूसे यांनी आज नागपूर येथून समृद्धी महामार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पाहणीवेळी आमदार संजय रायमूलकर उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या पाहणी दरम्यान मेहकरपासून २० किलो मीटर दूर असलेल्या शिवणी पिसा येथील पाण्याची पाईपलाईनमधील गळतीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने कंत्राटदार यांनी ही दुरुस्ती १५ दिवसात करण्याचे निर्देश दिले.


Back to top button
Don`t copy text!