लाँच आधीच समोर आली iPhone 12 ची किंमत, एकत्र ४ आयफोनची लाँचिंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: टेक ब्रँड अॅपलकडून लकवरच 2020 iPhone लाइनअप लाँचची घोषणा करण्यात येवू शकते. नवीन लीकमध्ये म्हटले की १३ ऑक्टोबर रोजी अॅपलचा आयफोन १२ लाइनअप वरून पडदा हटवला जावू शकतो. लीक्स्टर Kang कडून सांगण्यात आले आहे की, अॅपल या इव्हेंटमध्ये एकत्र ४ आयफोन घेवून येणार आहे. तसेच कंपनी HomePod Mini स्मार्ट स्पीकर आणणार आहे.

AppleTrack कडून म्हटले की, Kang कडून करण्यात आलेले भाकीत आतापर्यंत खरे ठरले आहेत. नवीन लीक मध्ये म्हटले की, पुढील आठवड्यात अॅपल चार डिव्हाइसेज iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लाँच करण्यात येणार आहेत. या सर्व डिव्हाइसेजवर अॅपल ५ जी कनेक्टिविटीसोबत आणणार आहे.

इतकी असू शकते किंमत या सर्व आयफोन Dolby Vision HDR स्टँडर्डमधून शूट करू शकतील. ग्लास स्क्रीन कन्स्ट्रक्शन यात पाहायला मिळू शकतो. लीक्सच्या माहितीनुसार, iPhone 12 mini ची स्क्रीन साईज ५.१ इंचाचा डिस्प्ले असेल. याची किंमत ६९९ डॉलर म्हणजेच ५१ हजार रुपये किंमत असणार आहे. तर ६.१ इंचाचा डिस्प्लेचा iPhone 12 यूएसमध्ये ७९९ डॉलर म्हणजेच जवळपास ५८ हजार ३०० रुपये किंमत असू शकते. दोन्ही डिव्हाईसेजमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात स्टोरेज ६४ जीबी पासून २५६ जीबी पर्यंत पाहायला मिळू शकतो. नोव्हेंबर पर्यंत रिलीज 

लिक्स्टरकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, iPhone 12 Pro चा डिस्प्ले ६.१ इंचाचा असणार असून याची सुरुवातीची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच ७३ हजार रुपये असू शकते. सर्वात पॉवरफुल iPhone 12 Pro Max डिस्प्ले ६.७ इंचाचा असून याची किंमत १०९९ डॉलर म्हणजेच ८० हजार रुयपांपासून याची किंमत सुरू होईल. अॅपलच्या या इव्हेंटमध्ये MagSafe वायरलेस चार्जर सुद्धा लाँच केले जावू शकते. नवीन आयफोन्स २३-२४ ऑक्टोबर ते २०-२१ नोव्हेंबर दरम्यान रिलीज केले जावू शकतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!