स्थैर्य, सातारा, दि. १५ : जिहे गाव पूर्णपणे कोरन्टाइन झाल्यामुळे गावातील शेतमजूर, कष्टकरी वर्गाचे दैनंदिन जीवन अडचणीचे झाले आहे. ही अडचण जाणून जिहे गावच्या अभिनव जेष्ठ नागरिक संघटनेचे कार्याध्यक्ष जनार्दन घाडगे गुरुजी तसेच जिहे गावचे पोलीस पाटील किरण जगन्नाथ फडतरे यांच्या समन्वयातून अन्नधन्याचे किट वाटप करण्यात आले. या वेळी कैलास जाधव, समरजित गोडसे, रूपाली मुळे, स्वाती बल्लाळ, माया पवार, दिपेंती चिकणे, ऍड.शैला जाधव कार्यकर्ते उपस्थित होते.यापूर्वीही लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील 1300 कामागर कुटूंबांना अन्नधान्यचे वाटप केले आहे.
संस्थेचे देणगीदार आणि हितचिंतकांनी केलेल्या मदतीतून हे शक्य झाले. जिहे गावाने शासनाच्या वेळोवेळी होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.लवकरच जनजीवन पूर्व पदावर येईल असा आशावाद यावेळी लेक लाडकी अभियानाच्या ऍड.वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केला.