
दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र (रजि.) यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील उद्योजक, कलावंत यांना कोकनरत्न पुरस्कार अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व येथे बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास समाज कल्याण विभाग सचिव दिनेशजी डिंगळे, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत हे जातीने हजर होते, सदर प्रसंगी उद्योजक अशोक कवाडे, साहित्यिक राष्ट्रपाल सावंत, भगवान साळवी, मधुकर सकपाळ, राजेश जाधव आदी कलावंतास पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरशेवटी शिवाजी मोहिते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.