सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण भरले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२२ । सातारा । कास तलाव (धरण) परीसरात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या संततधार पावसामुळे सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण भरून वाहू लागले आहे.यामुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

कास परिसरात मागील काही दिवसांपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसाने कास धरणातील पाण्याची आवक वाढत होती.मध्यरात्री सातारा शहराला व कास पठाराला पाणी पुरवठा करणारे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्या वरून पाणी वाहू लागले. नागरिकांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन धरणाची पाणी क्षमता पालिकेकडून वाढविण्याचे काम सध्या सुरु आहे.००.१ टीएमसी क्षमतेवरून ००.५ टीएमसी अशी क्षमता वाढविण्यात येत आहे.सध्या धरणात ००.३ टीएमसी धरण भरले आहे.धरणाची भिंतीची उंची वाढवून साठवण क्षमता दुप्पटीपेक्षा जास्त करण्याच्या कामामुळे धरण भरण्यास वेळ लागला.सद्या धरणाची पाणी पातळी ४७ फूट आहे.धरणात यावर्षी मुबलक पाणी साठा झाल्याने शहराच्या पश्चिम भागाला वर्षभर भरपूर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!