कऱ्हाड पाेलिसांनी चाेरांसह पकडले साडे चार लाखांचे साेने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


स्थैर्य, कऱ्हाड, दि.२: शहर व परिसरात सोन साखळी स्नॅचिंग
करणार्‍या तालुक्यातील दुशेरे येथील दोन चेन स्नॅचर यांना शहर पोलिसांच्या
गुन्हे प्रकटीकरण शाखेने पकडले. दोघेही पर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत
असताना दत्त चौकात काल रात्री उशिरा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.

त्या दोघांनी सहाहून अधिक सोन साखळीच्या चोऱ्यांची
कबुली दिली आहे. त्यात पोलिसांनी साडे चार लाखांचे सोने व त्यांच्या दोन
पल्सर दुचाकी असा पाच लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महेश
आनंदराव जाधव (वय 30), आकाश बापू लाडे (25, दोघेही रा. दुशेरे) अशी अटक
झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस
अधीक्षक धीरज पाटील यांनी आज येथे भेट दिली. त्यांनी शहर पोलिसांचे कौतुक
केले. पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला.

श्री. बन्सल म्हणाले, शहर व परिसरात सोनसाखळीच्या
चोऱ्या होत होत्या. त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते.
त्यांनी दोघा सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत
होणार्‍या चैन स्नॅचिंगच्या चोरीच्या तपासासाठी डीबी पथक तयार केले होते.
त्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यात तालुक्यातील दुशेरे
येथील दोघेजण महागड्या पल्सर सारख्या दुचाकीवरून पिरत आहेत. त्या
गाड्यावरून ते महिलांच्या गळ्यातील चैन स्नॅचिंग करत आहेत. त्या अनुषंगाने
मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खात्री केली.

पोलिसांनी शोध घेतल्यानंतर चैन स्नॅचिंग करणाऱ्या
दोघांवर पोलिसांचा संशय बळावला. मात्र ते दोघेही 15 दिवसापासून फरार होते.
गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यांची माहिती काढली असता ते दोघेही कर्नाटकात
पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी त्याच्याही मागे लागून सापळा
रचला. त्यावेळी ते दोघे दत्त चौक येथे पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात
अडकले. त्या दोघांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे कसून तपास केला.
त्यावेळी दोघांनी शहर व परिसरात सहा चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली
दिली आहे. त्यातील चार लाख 46 हजार रूपयांची सोन्याची सहा मंगळसूत्रे
पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली आहेत. त्यांच्याकडून दोन महागड्या तब्बल
एक लाख 20 हजारांच्या पल्सरही जप्त केल्या आहेत. त्या दुचाकी त्यांनी
गुन्ह्यात वापरल्या आहेत.

पोलिसांनी दुचाकी, सोने असा तब्बल 5 लाख 66 हजारांचा
मुद्देमाल जप्त केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोलिस उपाधिक्षक
डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या
नेतृत्वाखाली डीबीचे सहाय पोलिस निरीक्षक विजय गोडसे, पोलिस उपनिरीक्षक भरत
पाटील, भैरवनाथ कांबळे, सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार सतीश जाधव,
नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलिस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती
लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांनी कारवाईत
सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!