
दैनिक स्थैर्य | दि. ७ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण मार्केट यार्डमधील सुप्रसिद्ध युवा व्यापारी सिद्धेश शहा यांनी आपला २८ वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने मूकबधिर महाविद्यालय येथे साजरा केला.
तरुण पिढीतील अनेकजण आजकाल वाढदिवस साजरा करताना डिजे लाऊन, धांगडधिंगाणा घालून, पार्ट्या करून पैसे वाया घालवताना दिसतात. त्याउलट आसपासच्या गरजू लोकांना जाणिवपूर्वक मदत करताना अन्नदान करून युवा व्यापारी सिद्धेश धनेश शहा यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
शाळेतील विद्यार्थिनींनी औक्षण केले. यावेळी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव वैशाली चोरमले, मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, शिक्षिका हेमा गोडसे, विजया भोजने, निर्मला चोरमले यांनी या कार्याचे कौतुक करून महात्मा शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानले.
यावेळी कीर्ती सिद्धेश शहा, समय्या व डॉ. सिद्धांत दोशी, करिश्मा व तेजस शहा, माहीर गांधी, जिनेंद्र गांधी, यशराज दोशी, युवा उद्योजक ओंकार शहा, यश डुडू, क्षितिज घडिया, आर्यन दोशी आदी मित्रपरिवार उपस्थित होता.