जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट


दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत( काऊंसिल जनरल) फुकाहोरी यासुकाटा यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई काऊंसिल जनरल कार्यालयातील कानेको तोषिहिरो, मोरी रेईको उपस्थित होते.

जपान आणि महाराष्ट्राचे उद्योगांसह कला, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आगामी काळात हे संबध अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी काळात जपानच्या जेट्रोसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्याचे सुतोवाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. याशिवाय राज्यातील विविध भागातील औद्योगिक वसाहतींनी भेट देण्याची विनंती केली. राज्यातील उद्योगांना जवळून जाणून घेण्यासही ही बैठक घेतली जाईल.


Back to top button
Don`t copy text!