दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । सातारा । महात्मा गांधींच्या ह्या विचारांना दुजोरा देत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी द्वारा नुकताच महाराष्ट्रात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचे प्रशिक्षण दि. ५-६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणात महाराष्ट्रातील एकूण १३ जिल्ह्यांमधील २५ सरपंच उपस्थित आहेत ज्यात २२ पुरुष आणि ३ महिला सरपंच आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रबोधिनीचे सल्लागार श्री. मिलिंद आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी “राष्ट्रतो सर्वोपरी” या विषयावर सर्व सरपंचांना उद्भोदन केले. उपस्थित सरपंचांना पुढील दोन दिवसात मार्गदर्शन करण्यासाठी शरद बुट्टे पाटील (जिल्हा परिषद सदस्य), डॉ. प्रसाद देवधर (भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान), दत्ता काकडे (सरपंच परिषद), संजय यादवराव (ग्रामीण पर्यटन), पोपटराव पवार हे वक्ता म्हणून उपस्थित आहेत. कार्यक्रम संयोजक म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी अमेय देशपांडे व कार्यक्रम समन्वयक अनिल पांचाळ उपस्थित होते.