
दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। फलटण । पिंपरद (ता. फलटण) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने निवडलेला डीजे व फटाकामुक्त जयंतीचा निर्णय हा सर्वोत्तम आहे.
अशा प्रकारे सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी झाल्या तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होणार नसल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी केले.
ते पिंपरद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजन बैठकीत बोलत होते. यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे, उपसरपंच अनिल ढमाळ, ग्रामपंचायत सदस्य विकास ढमाळ,
पोलीस पाटील सुनील बोराटे, फलटण तालुका सुतार समाज संघटनचे अध्यक्ष शिवाजीराव सुतार, संजय लालगे, शरद मोरे, मंडळाचे सल्लागार सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.