भारतीय निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

निफ्टी ११,६०० आणि सेन्सेक्स मध्ये ३५०अंकांनी वाढ 

स्थैर्य, मुंबई, २८ : आजच्या व्यापारी सत्रात बँक आणि मिडिया स्टॉक्सच्या नफ्याच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीने ०.१७ % किंवा ८८.३५ अंकांची वृद्धी घेत ११,६४७.६० अंकावर विश्रांती घेतली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्समध्येही ०.९०% किंवा ३५३.८४ अंकांची वाढ झाली व तो ३९,४६७.६० अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज इंडसइंड बँक (११.७४%), अॅक्सिस बँक (७.७४%), युपीएल (४.८८%), एसबीआय (४.५२%) आणि आयसीआयसीआय बँक (४.४१%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर जेएसडब्ल्यू स्टील (२.८७%), हिरो मोटोकॉर्प (२.३४%), डॉ. रेड्डीज (१.४२%), पॉवर ग्रिड (१.४६%) आणि इन्फोसिस (१.२७%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बँकिंग इंडेक्स ४% नी उसळला तर निफ्टी ऑटो अर्ध्या टक्क्यांनी घसरला. मेटल इंडेक्स लाल रंगात बंद झाला. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५५% ची वृद्धी झाली तर स्मॉलकॅपमध्ये ०.२३% ची घसरण दिसून आली.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज : कंपनीने सांगितले की, त्यांनी यूएसएफडीएद्वारे निर्देशित केलेले उल्लंघन आणि विचलन दूर केले आहेत. आजच्या व्यापारी सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये १.४२% ची घसरण झाली व त्यांनी ४,३७४.०० रुपयांवर व्यापार केला.

एसबीआय : स्टेट बँकेच्या स्टॉक्समध्ये ४.५२%ची वृद्धी झाली आणि क्रेडिट रेटिंग फर्मने शेअरला ‘सेल’ वरून ‘बाय’ मध्ये अपग्रेड केले. त्यानंतर शेअरने २२५.४० रुपयांवर व्यापार केला.

आयसीआयसीआय बँक :आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉक्समध्ये ४.४१% ची वृद्धी झाली. कंपनीने आयसीआयसीआय सिक्युरिटीजची २ टक्के भागीदारी किंवा ६,४४२,००० शेअर ३१० कोटींच्या ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून विकले. त्यानंतर शेअरने ४०९.५० रुपयांवर व्यापार केला.

एनएमडीसी लिमिटेड:कंपनीने नुकतेच नागरनार आयर्न अँड स्टील युनिटच्या डिमर्जरविषयी सांगितले. गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी डिमर्जरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ११.७१% ची वृद्धी झाली व त्यांनी १०७.३५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७३.३९ रुपयांच्या उच्च पातळीवर स्थिरावला. या आठवड्यात रुपयात १.९% ची वृद्धी झाली, जी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सर्वात मोठी साप्ताहिक वृद्धी होती. यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयात अशा प्रकारची वाढ २०१८ मध्ये दिसून आली होती.

जागतिक बाजारात संमिश्र संकेत : आशियाई आणि युरोपीय बाजारांनी आजच्या सत्रात संमिश्र जागतिक मार्केटचे संकेत दिले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आर्थिक विकासावर जोर देण्यासाठी अमेरिकी धोरण बदलले आणि त्यानंतर अमेरिकी डॉलरमध्ये तेजी आली. नॅसडॅकमध्ये ०.३४% ची घसरण झाली. निक्केई २२५ मध्ये १.४१% घट झाली. तर हँगसेंगमध्ये ०.५६% ची वृद्धी दिसून आली. दुसरीकडे, एफटीएसई १०० मध्ये ०.०२% ची घट झाली. एफटीएसई एमआयबीमध्ये ०.१२% ची वृद्धी झाली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!