भारतीय निर्देशांकांनी मागील ७ महिन्यांतील सर्वात उच्चांकी स्थिती गाठली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, ६ : आजच्या सत्रात भारतीय निर्देशांकांनी मागील ७ महिन्यांतील सर्वात उच्चांकी स्थिती गाठली. या प्रगतीचे नेतृत्व बँक आणि ऑटो क्षेत्राने केले. निफ्टी १.३८% किंवा १५९.०५ अंकांनी वधारला व ११,६०० ची पातळी ओलांडत ११,६६२.४० वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.५४% किंवा ६००.८७ अंकांनी वाढला व ३९,५७४.५७ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११६५ शेअर्स घसरले, १४८८ शेअर्सनी नफा कमावला तर १५९ शेअर्स स्थिर राहिले. टाटा मोटर्स (७.८८%), एचडीएफसी (७.५६%), अदानी पोर्ट (३.४५%), एमअँडएम (३.५४%) आणि इंडसइंड बँक (३.३७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर ब्रिटानिया (१.४७%), कोल इंडिया (१.१८%), विप्रो (१.३२%), हिंडाल्को (१.३४%) आणि टाटा स्टील (१.१८%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

आयटी, फार्मा, एनर्जी आणि एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज हिरव्या रंगात विश्रांती घेतली. बीएसई मिडकॅप ०.५९% नी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप ०.५५% नी वधारला.

इंडसइंड बँक लिमिटेड : इंडसइंड बँकेचे शेअर्स ३.३७% नी वाढले व त्यांनी ६२१.८५ रुपयांवर व्यापार केला. बँकेने २०२१ या वित्तीय वर्षातील दुस-या तिमाहीतील अंदाजे आकडेवारी जारी केल्यानंतर हे परिणाम दिसले. जुलै-सप्टेंबर तिमाहित बँकेचे डिपॉझिट १० टक्क्यांनी वाढले तर नफ्यात वार्षिक वृद्धी २% झाली.

टाटा मोटर्स लिमिटेड : २०२१ या वित्तीय वर्षातील दुस-या तिमाहीत टाटा मोटर्सची एकूण विक्री १६% नी घटली. जग्वार लँड रोव्हरसहित एकूण आकडा २,०२८७३ युनिट एवढ्यापर्यंत झाला. या घसरणीनंतरही कंपनीच्या स्टॉक्सनी ७.८८%ची उच्चांकी घेतली व आजच्या सत्रात १४४.४५ रुपयांवर व्यापार केला.

थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेड : थायरोकेअर टेक्नोलॉजीजने ४ लाख कोव्हिड-१९ आरटी-पीसीआर टेस्ट घेतल्या. कंपनीचा महसूल ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत ३७% नी वाढला. मागील तिमाहिच्या तुलनेत लो रिव्हेन्यू १७१ टक्क्यांनी वाढला. कंपनीचे स्टॉक्स १३.८७ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ८८२.५० रुपयांवर व्यापार केला.

रामको सिस्टिम्स लिमिटेड : कंपनीचे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील केमिकल बिझनेस विभागाची वितरण साखळी काम बदलून देण्यासाठी टोल लॉजिस्टिकने रामको लॉजिस्टिक्स इआरपी कंपनीची निवड केली. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ४.९९% नी वाढले व त्यांनी ४९१.३० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये सलग दुस-या दिवशी नफा होऊनही भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.४६ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारण झाल्यानंतर गुंतवणुकदारांनी अधिक वित्तीय मदतीची आशा केल्याने जागतिक निर्देशांत हिरव्या रंगात दिसून आले. नॅसडॅकने २.३२%, एफटीएसई १०० ने ०.०८% ची वृद्धी घेतली. तर एफफटीएसई एमआयबीने ०.५१%, निक्केई २२५ ने ०.५२% ची आणि हँगसेंग कंपनीने ०.९०% ची वृद्धी अनुभवली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!