निर्देशांकांत झपाट्याने घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । मुंबई । भारतीय बेंचमार्कांची सुरुआत निर्देशांकांमध्ये घसरणी बरोबर झाले आणि त्यानंतर ते आपले आशियाई आणि अमेरिकन निर्देशांकाच्या पाठलाग करत नेगेटिव ज़ोनमध्ये गेले, कारण शुक्रवारी व्यापार सत्र बंद होतांना त्यामध्येही घसरणच झाली होती. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की निर्देशांक ओपनिंगनंतर रिकव्हरीचे साक्षीदार ठरले परंतु खाली जाणा-या हालचाली सुरू ठेवण्यापूर्वी ते एकत्रिकरणात गेले. फियर निर्देशांत, इंडिया विक्स मध्ये ८ टक्क्यांनी वाढ आली आणि या स्टॉकचा ८ जुलै नंतर सर्वोत्कृष्ट सेशन ठरला. निफ्टी निर्देशांकामध्ये १५० गुणांची घसरण आली आणि तो लाल रंगात संपला. दुसरीकडे निफ्टी बँकने ६०० पेक्षा जास्त गुण गमावले आणि दिवसाचा शेवट १% पेक्षा जास्त तोट्यात झाला.

व्यापक बाजार चळवळ: बाजारातील व्यापक कामगिरीकडे पाहता, निर्देशांक संमिश्र बंद झाले, कारण मिडकॅप निर्देशांकात ०.८१ टक्के तोटा आणि स्मॉल कॅप निर्देशांकात ०.०३ टक्क्यांनी वाढ झाली. निफ्टी फार्मा आणि रिअल्टी इंडेक्स वगळता इतर क्षेत्रातील निर्देशांकांची नोंद लाल रंगात झाली. बँकिंग आणि फायनान्शियल निर्देशांक निफ्टी प्रायव्हेट बँक एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक यांच्या नेतृत्वात अव्वल तोट्याचा निर्देशांक ठरला. स्टॉकाच्या प्रमुख बाजारावर निफ्टी ५० पैकी ४१ स्टॉक नकारात्मक क्षेत्रात संपले. वजनदार स्टॉक एचडीएफसी बँक अव्वल तोटा ठरला, तर एचडीएफसी लाइफ आणि इंडसइंड बँक अव्वल तोट्यात असलेल्या स्टॉक ठरले. यामध्ये एनटीपीसी, बीपीसीएल आणि डिव्हिस लॅब या कंपन्यांचा समावेश सर्वाधिक होता. प्रत्येकाला १ टक्क्यांहून अधिक फायदा झाला.

बातम्यांमधील स्टॉक्स: मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत एचडीएफसी बँकेने अधिक प्रॉफिट नोंदविला तरी या स्टॉकमध्ये आजच्या सत्रात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे आणि हा स्टॉक दिवसातील अपयशी ठरला म्हणून बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स जस्ट डायलमध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी घेणार असल्याच्या वृत्तामुळे जस्ट डायलचे शेअर्स ५ टक्क्यांपेक्षा घसरले. कंपनीने आपला वित्त वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर एलअँडटीएफएच स्टॉकनी ५ टक्क्यांहून अधिक सुधारणा केली.

थोडक्यात सांगायचे तर, बेंचमार्क निर्देशांकांनी दिवसात जोरदार कपात केली परंतु दिवसअखेर काही तोटा कमी करण्यात यशस्वी झाला, तरीही तो लाल रंगात संपला. बीएसईचा ३० स्टॉक असलेला सेन्सेक्स ५८६ अंकांनी किंवा १.१० टक्क्यांनी कमी होऊन ५२५५३ वर तर निफ्टी निर्देशांक १७१ अंकांनी किंवा १.०७ टक्क्यांनी खाली १५७५२ वर बंद झाला. निफ्टी वर पुढच्या काळात पहाण्यासाठीची पातळी वरच्या बाजूस १५९०० – १५९५० आहे आणि खाली जाणार्‍या बाजूकडे १५७०० – १५६५० ही पातळी असेल.


Back to top button
Don`t copy text!