स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्तिशः लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश


दैनिक स्थैर्य | दि. 26 फेब्रुवारी 2025 | मुंबई | “पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही.

मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत; असे मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले कि; पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो.

पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.”


Back to top button
Don`t copy text!