
दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सन १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे नवाब मलिक यांना काळे फासून निषेध करण्यात आला.
सन १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे आंदोलन केले. यावेळी नवाब मलिक ,महाविकास आघाडी राज्य सरकार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आणि नवाब मलिक यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे ,ऍड प्रशांत खामकर, चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, रीना भणगे, सुनिशा शहा, कुंजा खंदारे, अश्विनी हुबळीकर, वनिता पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.